राज्यात शुक्रवारपासून चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सहा ते आठ एप्रिल या काळात कोकण, मराठवाड्यात आणि सात ते आठ एप्रिल दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. या काळात तापमानातही दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण तमिळनाडू ते पूर्व विदर्भापर्यंत हवेच्या खालच्या स्तरात एक द्रोणिका रेषा तयार झाली आहे. ही रेषा कर्नाटक आणि मराठवाड्यावरून जाते. त्यामुळे शुक्रवारपासून हवेत आद्रता वाढून पाच ते आठ एप्रिल दरम्यान मध्य महाराष्ट्रात. सहा ते आठ एप्रिल या काळात कोकण, मराठवाड्यात आणि सात ते आठ एप्रिल दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.