रूई (ता. हातकणंगले) चे ग्रामदैवत हजरत अब्दुलमलिकसो यांच्या उरुसाला आज, गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. उरुसनिमित्त ग्रामपंचायत व उरुस कमिटीकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उरुसानिमित्त बुधवारी रात्री गंधरात झाली असून, गुरूवारी भरउरुसाचा कार्यक्रम होणार आहे. पहाटे पाच वाजता शासकीय गलेफ वाहण्यात आली.
दर्गा परिसर व गावात पाळणे, खेळणी, विविध प्रकारचे खाद्याचे स्टॉल, आईस्क्रीम स्टॉल उभारले आहेत. विविध कार्यक्रमांचेही
आयोजन केले आहे. लोकसभा निवडणूक असल्याने रात्रीचे करमणुकीचे कार्यक्रम रद्द केले आहेत. धावणे, सायकल, रिव्हर्स रिक्षा पळविणे या स्पर्धांसोबतच शनिवारी सायंकाळी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
हे सर्व कार्यक्रम व उरूस व्यवस्थित पार पडण्यासाठी सरपंच शकीला कोन्टूर, उपसरपंच अशोक आदमाने, अभय काश्मिरे, माजी सरपंच व विद्यमान सदस्य जितेंद्र यादव, भाऊसाहेब फास्के, रावसाहेब आबदान, नंदकुमार साठे, संजय मगदूम यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, उरुस कमिटी, पोलिस प्रशासन, प्राथमिक आरोग्य विभाग, परिश्रम घेत आहे.