कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ वर्षांवरील आणि २६ वर्षांपर्यंतच्या अविवाहित किशोरवयीन मुलींना गर्भाशयाचा कर्करोग प्रतिबंधक मोफत लसीकरण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.बाजारात साधारणतः दोन हजार रुपये किंमत असलेली ह्युमन पॅपिलोमा व्हायरस प्रतिबंधक म्हणजेच ‘एच.पी.व्ही.’ ही लस (HPV Vaccine) सीएसआर फंडातून सामाजिक बांधिलकी म्हणून मोफत लसीकरण राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
