पुढील दोन दिवस उष्णतेची लाट!

एप्रिल आणि मे महिन्यात देशात प्रचंड उष्णता वाढण्याची शक्यात आहे. हवामान खात्याने एप्रिल आणि मे मध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाजवर्तवला आहे.महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये तापमाणाचा पारा 40 अंशांच्या वर नोंदवला गेला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून देखील अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे.

सोलापूरमध्ये हंगामातील उच्चांकी म्हणजेच 43.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात लोकांनी कडक उन्हात घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने 9 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रासह अरुणाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, पंजाब आणि इतर राज्यांसह विविध राज्यांमध्ये पाऊस आणि उष्णतेच्या लाटेच्या स्थितीचा अंदाज वर्तवला आहे. अरुणाचल प्रदेशच्या ईशान्य भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

उत्तर कर्नाटक, झारखंड, रायलसीमा, किनारी आंध्र प्रदेश आणि यानममध्ये उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. हवामान विभागाने सोमवारी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये गारपीट होण्याचा इशारा दिला आहे, तर आज विदर्भातील अमरावती आणि यवतमाळमध्ये उष्ण लाटेचा येलो अलर्ट जारी केला आहे.