मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून रडीचा डाव खेळला जातोय, अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरागेंनी सरकारवर केली आहे. राज्यात तीन राजे मात्र एकालाही जनतेवर दया नाही. तसेच आज गावागावात होणारे रास्ता रोको शांततेत करा आणि आज संध्याकाळी रास्ता रोकोचे रूपांतर धरणे आंदोलनात करा, असे आवाहन मनोज जरांगेंनी आंदोलकांना केला आहे. ते जालन्यात माध्यामांशी बोलत होते. तसेच उद्या (25 फेब्रुवारी) महाराष्ट्रतील मराठा बांधवांशी बोलणार असून काही महत्त्वाचे निर्णय घेणार असल्याचा इशारा मनोज जरांगेंनी यावेळी दिला आहे.
मनोज जरांगे म्हणाले, राज्य सरकारला आंदोलनाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. या राजाला दया नाही. राजे तीन – तीन असल्याने राजाला दया आणि माया नाही. आज गावागावात होणारे रास्ता रोको शांततेत करा. सकाळी 11 ते दुपारी 1 याच वेळेत आंदोलन करा. सायंकाळी 4 ते 7 आंदोलन करू नका. उद्यापासून रास्ता रोको होणार नाही. 25 फेब्रुवारीला पुन्हा बैठक होणार असून समाज बांधवांशी मला महत्त्वाचे बोलायचे आहे. आज संध्याकाळी रास्ता रोकोचे रूपांतर धरणे आंदोलनात करा.