आजपासून कसबे डिग्रज येथे उरूसानिमित्त विविध कार्यक्रम!

आज कसबे डिग्रज येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. येथील हजरतपीर गैबीसाब, इमामशा, तानपीरसाब यांचा उरूस दि. ९ ते ११ तारखेपर्यंत उरूस साजरा होतो आहे. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज मंगळवार, दि. ९ एप्रिल रोजी गंधरात्र व गुढीपाडवा निमित्त सायंकाळी सात वाजता फक्त महिलांसाठी लावण्य चंद्रा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बुधवार, दि. १० एप्रिल रोजी गलेफ व नैवेद्य तसेच सायंकाळी सात वाजता बारा गावच्या बारा अप्सरा हा करमणुकीचा कार्यक्रम होईल.

गुरुवार, दि. ११ एप्रिल रोजी दुपारी चार वाजता कुस्त्यांचे जंगी मैदान होणार आहे. या मैदानात उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत व हरियाणा येथील विशाल भोंडू यांच्यामध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती होणार आहे. या कुस्तीसाठी दोन लाख अकरा हजार एकशे अकरा बक्षीस देण्यात येणार आहे. उपमहाराष्ट्र केसरी सागर बिराजदार व उत्तर महाराष्ट्र केसरी योगेश पवार यांच्यात द्वितीय क्रमांकाची कुस्ती होईल.

याच बरोबर अनुक्रमे बाळू अपराध – मनीष पवार, श्रीमंत भोसले मनोज माने, वाशिम पठाण लहसून भागवत, आसिफ मुलाणी अनिरुद्ध पाटील या प्रमुख कुस्त्यांबरोबर अनेक रंगतदार कुस्त्या होणार आहेत. या कार्यक्रमांसाठी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.