सोलापूरच्या खासदार शिंदे यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. या वेळी इच्छुकांना पक्षासाठी तुमचे योगदान काय, पक्षाने तुम्हाला वगळून जर उमेदवार अन्य कोणाला दिल्यास तुमची भूमिका पक्षनिष्ठ म्हणून काय असेल असे मोजकेच प्रश्न विचारले. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार विशाल पाटील उपस्थित होते. तत्पुर्वी काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्वजित कदम, जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी खासदार शिंदे यांचे स्वागत केले.
कोणत्याही शक्तिप्रदर्शनाविना शुक्रवारी सांगलीत विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. सांगली, मिरजसह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघातही तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्यासह दोघांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली.दरम्यान, काँग्रेसचे वाळवा तालुकाध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील यांनीही आपण मुलाखत दिली असून, पक्षाने संधी दिली तर निवडणूक लढविण्याची आपली तयारी असल्याचे सांगितले.
तसेच याच मतदारसंघातून पक्षाच्या महिला पदाधिकारी मनीषा रोटे यांनीही उमेदवारीची मागणी केली आहे. शिराळ्यातून रवि पाटील, जतमधून आमदार विक्रमसिंह सावंत, तुकाराम माळी, खानापूर-आटपाडीमधून रविकांत भगत, गजानन सुतार आदींनी मुलाखती दिल्या.