महाविकास आघाडी आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीनंतरही सांगलीच्या उमेदवारीचा तिढा सुटत नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षातील जिल्ह्यातील नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.म्हणूनच काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील अपक्ष आणि काँग्रेस पक्षाकडून असे दोन अर्ज भरणार आहेत.
पक्षाने उमेदवारी दिली तर ठीक नाही तर बंडखोरी होणार हे निश्चित आहे.सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील दुसऱ्या फळीतील नेते आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून, विशाल पाटील यांच्यावर बंड करण्यासाठी दबाव वाढला आहे. यातूनच विशाल पाटील यांनी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली तर ठीक, नाही तर बंड करण्याची तयारी ठेवली आहे.
काँग्रेसच्या नेत्यांनी विशाल पाटील यांना काँग्रेस आणि अपक्ष असे दोन अर्ज भरण्याची सूचना दिली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटला आणि सांगलीची जागा काँग्रेसला मिळाली तर उत्तमच आहे. नाही मिळाली तर विशाल पाटील बंडखोरी करणार हे निश्चित झाले आहे, अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली आहे.