तांदुळवाडी तालुका वाळवा येथे उपनेते प्रा. नितीन बानुगडे पाटील संपर्कप्रमुख पश्चिम महाराष्ट्र, जिल्हा प्रमुख अभिजीत आबा पाटील, महाराष्ट्र राज्य शेतकरी सेना संघटक लालासाहेब पाटील यांच्या उपस्थिती मध्ये भाजपा ग्रामविकास पंचायतराजचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. प्रमोद संपतराव खोत व नंदकुमार शंकर पाटोळे वाळवा तालुका अध्यक्ष केंद्रीय माहिती अधिकार यांचा जाहीर प्रवेश झाला.
यावेळी उपनेते प्रा. नितीन बानुगडे पाटील म्हणाले की पुढील काळात गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिकहे अभियान राबवणार आहोत. जिल्हाप्रमुख अभिजीत आबा पाटील यांनी प्रमोद खोत यांना शिराळा विधानसभा मतदारसंघ संघटक म्हणून कार्य करण्यास जबाबदारी सह शुभेच्छा दिल्या व भक्कमपणे सोबत काम करू, असे मत मांडले.या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक इस्लामपूर शहर प्रमुख उदयसिंह सरनोबत व आभार प्रा. प्रमोद खोत यांनी मांडले.
यावेळी युवा सेना वाळवा तालुका अधिकारी मानव गवंडे, युवा सेना इस्लामपूर शहर अधिकारी फजल हवलदार, ज्येष्ठ शिवसैनिक दत्तात्रेय गर्जे बहादुरवाडी, आनंदा गावडे कोरेगाव, पोपट तळप भडकंबे, जालिंदर जाधव आदी शिवसैनिक उपस्थित होते.