गुढीपाडव्याच्या पावन मुहूर्तावर सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्यांना गुढीपाडव्याच्या पावन पर्वापूर्वीच सरकारी तेल कंपन्यांनी मोठा दिलासा दिला आहे.पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्या आहेत. खरे तर पेट्रोल आणि डिझेल जीवनावश्यक बनले आहे. पण इंधनाचे दर गेल्या काही वर्षांपासून चांगलेच कडाडले आहेत. इंधनाच्या दरासमवेतच महागाई देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
वाढत्या महागाईचा आलेख मात्र सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढवत असून यामुळे खिशाला मोठी कात्री बसत आहे. पण मराठी नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वीच सर्वसामान्यांना महागाईच्या मोर्चावर दिलासा मिळालाय. 14 मार्च 2024 ला पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 2 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.