मोठी बातमी : उन्मेष पाटलांच्या हाती शिवबंधन!

लोकसभा निवडणुकीत यंदा भाजपने ऐनवेळी उन्मेष पाटील यांना डावलून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. भाजपकडून जळगाव लोकसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा लोकसभेसाठी तिकीट न मिळाल्याने उन्मेष पाटील नाराज होते. त्यामुळे नाराज उन्मेष पाटील यांनी मंगळवारी ठाकरे गटाचे नेत्यांची भेट घेतली. त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंचीही भेट घेतली होती.

भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश (UBT Shivsena) केला आहे. आज मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थिती हा पक्षप्रवेश पार पडला आहे. भाजपने लोकसभेचं तिकीट कापल्याने उन्मेष पाटील नाराज असल्याने ते ठाकरे गटात दाखल झाले आहेत.