ICSE, ISC Exam Schedule: दहावी, बारावी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; असं करा डाऊनलोड….

काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन, सीआयएससीईने सोमवार दि. २५ नोव्हेंबर रोजी आयसीएसई (१०वी) आणि आयएससी (१२वी) परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. विद्यार्थ्यांना cisce.org या अधिकृत वेबसाईटवरुन परीक्षेचं शेड्यूल डाऊनलोड करता येणार आहे.

वेळापत्रकानुसार, १०वी आयसीएसई बोर्डाची परीक्षा १८ फेब्रुवारी ते २७ मार्च या कालावधीमध्ये पार पडेल. तर बारावीची परीक्षा १३ फेब्रुवारी ते ५ एप्रिल यादरम्यान संपन्न होईल.

सीआयएससीई १०वी आणि १२वीची परीक्षा सुरु होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना ३० मिनिटं आधी परीक्षा केंद्रावर दाखल व्हायचं आहे. परीक्षा केंद्रामध्ये कॅलक्युलेटर, मोबाईल फोन, ब्लूटुथ, इयरफोन यासह इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स नेता येणार नाहीत.

वेळापत्रक चेक करा

बोर्डाची अधिकृत वेबसाईट cisce.org ला भेट द्या.

त्यानंतर १० वी १२वी डेट शीट लिंकवर .

त्यानंतर स्क्रीनवर एक पीडीएफ उघडेल.

ही पीडीएफ डाऊनलोड करता येईल.