हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) सावत्र भावाला फसवणूक केल्यामुळे मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वैभव पांड्या असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या याला त्यानं फसवणूक केली. याप्रकरणी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल कऱण्यात आली होती. त्यानंतर त्याला आज बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) सावत्र भाऊ वैभव पांड्या याला मुंबई पोलिसांनी फसणूकीच्या आरोपाखाली बेड्या ठोकल्या. हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांना व्यवसायात वैभव पांड्या यानं फसवल्याचा आरोप कऱण्यात आला होता. वैभव पांड्यासोबत पांड्या ब्रदर्सचा व्यावसाय होता. या व्यवसायात वैभव पांड्या यानं 4.3 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 37 वर्षीय वैभव पांड्या याला मुंबई पोलिसांनी फसवणूक प्रकऱणी अटक केली.
वैभव पांड्यासोबत क्रिकेटर पांड्या बंधूंचा व्यावसाय होता. मुंबईमध्ये त्यांचा व्यवसाय सुरु होता. पण या फर्ममधून वैभव पांड्या यानं 4.3 कोटी रुपये वळते केले. याचा फटका हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांना बसला, असे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. खोटी सही करुन फसवणूक केल्याचा वैभव पांड्या याच्यावर आरोप आहे.