परिक्षा कालावधीनंतर उन्हाळयात दीर्घ सुट्टीमध्ये विदयार्थ्याच्या अंगी असलेले सुप्त गुणांना वाव देण्याकरिता प्रति वर्षाप्रमाणे अॅथलेटिक्स खेळाचे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले जात आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रव्दारा अॅथलेटिक्स ( मैदानी ) या खेळाचे क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन दिनांक १५ ते २४ एप्रिल २०२४ या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल कुमठा नाका सोलापूर येथे करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा क्रिडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी दिली.
या प्रशिक्षण शिबीराकरिता तज्ञ व अनुभवी शासकीय मैदानी राज्य क्रीडा मार्गदर्शक गणेश पवार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच सूर्यनमस्कार, सर्वांगसुंदर व्यायाम, योगासने, प्राणायाम, ॲरोबिक्स, मनोरंजनात्मक खेळ व व्यक्तीमत्व विकास या बांबीवर विशेष भर दिला जाणार आहे. या शिबीरात सहभागी होणा- या विदयार्थ्याना विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. तरी सोलापूर शहर व जिल्हयातील सहभागी होऊ इच्छुकांनी आपली नांवे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कुमठा नाका सोलापूर येथे मैदानी राज्य क्रीडा मार्गदर्शक गणेश पवार (संपर्क क्रमांक ९९७००९५३१५ ) यांचेकडे नोंदवावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे.