सोलापूर येथील शांतता रॅलीला मंगळवेढा येथील एक लाख मराठा समाज उपस्थित राहणार असल्याची माहिती सकल मराठा समाज मंगळवेढा यांच्या वतीने देण्यात आली आहे.येत्या 7 ऑगस्टला मराठा समाजातील प्रत्येक गावातून सर्व महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
मंगळवेढ्यात सकल मराठा समाजाची आढावा बैठक संपन्न झाली यावेळी सोलापूर येथे मार्गदर्शन करण्यासाठी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळवण्यासाठी शांतता रॅली काढण्यात येणार आहे. लवकरात लवकर सगे सोयरेचा अध्यादेश काढून आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी मंगळवेढा मधील मराठा समाज बांधवांनी केली आहे.मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती दि.7 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली निघणार आहे. या रॅलीची तयारी पूर्ण झाली आहे.
