कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यांवर अचानक आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (cm Eknath Shinde) कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांची आढावा घेतली.हातकणंगलेबाबत (Hatkanangle Lok Sabha Election 2024) उशिरापर्यंत खलबते सुरू होती.
अपक्ष आमदारांच्या मध्यरात्री भेट घेऊन त्यांना आमदार प्रकाश आवाडे यांना थांबवण्यासाठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आमदार विनय कोरे आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर त्यांच्यावर ती जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सोमवारी मुख्यमंत्री शिंदे महायुतीच्या दोन्ही उमदेवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. सर्वांनी गांधी मैदानात उपस्थित राहण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहेत.
येथील एका खासगी हॉटेलमध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसोबत तब्बल पाच तास बैठक सुरू होती. यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उत्पादन शुल्कमंत्री शंभुराजे देसाई, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे, समरजीत घाटगे, आमदार प्रकाश आबिटकर आदी उपस्थित होते