आय लव्ह मंगळवेढाचे होणार आपला मंगळवेढा……

मंगळवेढा नगरपालिकेच्या समोरील आय लव्ह मंगळवेढा हे इंग्रजीत असून, ते आता नव्याने आपला मंगळवेढा असे करण्यात येणार असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंगळवेढा शहर यांच्या वतीने मंगळवेढा नगरपरिषदेसमोर असलेल्या आय लव्ह मंगळवेढा असे इंग्रजी लिहिलेली पाटी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ते तशाच पद्धतीचं मोठे नाव मराठीत आपला मंगळवेढा असे करण्यात यावे, अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंगळवेढा शहराच्या वतीने एक पत्र देण्यात आले होते.

त्यानंतर सातत्याने राजीव हजारे आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेसह शहरातील व तालुक्यातील आणि विद्यार्थी कार्यकर्त्यांकडून सेनेच्या सातत्याने पाठपुरावा केला.

मुख्याधिकाऱ्यांशी चर्चेनंतर मुख्याधिकारी चरण कोल्हे यांनी मनसेच्या वतीने देण्यात आलेल पत्र त्या पत्रानुसार लगेचठराव मंजूर केला.