इचलकरंजी शहरात चर्चा! 51 कोटींचा नेमका धनी कोण?

इचलकरंजी शहरासाठी नगरोत्थान योजनेतून 51 कोटींचा निधी मिळालेला आहे. यामुळे आता इचलकरंजी शहराच्या सौंदर्यात आणखीनच भर पडणार आहे. परंतु खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्यात मात्र नवीन राजकारण सुरू झालेले आहे. म्हणजेच या 51 कोटींचा नेमका धनी कोण आहे हे कोड शहरवासींना पडलेले आहे.

आवाडे यांच्या कार्यालयातून मागील वर्षभरापासून आमदार आवाडे यांनी पाठपुरावा केल्यामुळेच हा निधी मिळाल्याचा दावा केला आहे. तर दुसऱ्या बाजूला खासदार धैर्यशील माने यांनी महापालिका मंजूर करून आणल्यापासून शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे. रस्ते कामासाठी 51 कोटी रुपयांचा निधी धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे मिळालेला आहे असे शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी वक्तव्य केलेले आहे. त्यामुळे या निधीसाठी दोन नेत्यांनी वक्तव्य केल्यामुळे 51 कोटींचा धनी नेमका कोण? हे अजूनही स्पष्ट झालेलेच नाही.