माढ्यात २६ एप्रिलला शरद पवार यांच्या सहा जंगी सभा!

सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा करण्यासाठी दोन्ही आघाड्यांकडून जोरदार प्रचारसभा घेतल्या जात आहेत.महायुतीच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रचारात उतरले आहेत.दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील प्रचारसभांचा धडाकाच लावला आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर महाराष्ट्रात ही पहिलीच निवडणूक असल्याने शरद पवार आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपली संपूर्ण ताकद लावली आहे. दरम्यान, सध्या राज्यात चर्चेत असलेला माढा लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी शरद पवार यांनी मोठी रणनिती आखली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार तब्बल ६ सभा घेणार आहेत. माढा तालुक्यातील मोडनिंब, सांगोला , करमाळा याठिकाणी २६ एप्रिल रोजी शरद पवार (Sharad Pawar) सभा घेणार आहेत. तर ३० एप्रिलला फलटण आणि दहीवडीत शरद पवारांची सभा होणार आहे.