भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान…..

अनिलदादा सावंत मित्रपरिवार मंगळवेढा-पंढरपूरच्या वतीने सलगर बुद्रुक ता. मंगळवेढा येथे आज सोमवार दि.२२ रोजी पुरुष गट व महिला गट अशा दोन्ही गटामध्ये कुस्त्या संपन्न होणार आहेत. सकाळी 11 ते दुपारी दोन वाजेपर्यंत कुस्त्या नेमल्या जातील. याशिवाय महाराष्ट्रातील नामवंत मल्ल या कुस्तीच्या मैदानात सहभागी होऊन आपली कुस्ती खेळणार आहेत.

याशिवाय वस्ताद समाधान घोडके, पै.मारुती वाकडे,पै. अशोक चौंडे, दामोदर घुले, महेंद्र देवकते, दादासो पवार, मुरलीधर सरकळे लक्ष्मण रोडगे समाधान अभंगराव, मुबारक मुलानी नागा गायकवाड, आप्पा शिंदे सिताराम गावडे सत्यजित घोडके हरी येरवे हे सर्व वस्ताद पंच म्हणून उपस्थित राहणार आहेत.

तरी आज आयोजकांच्या वतीने रामचंद्र ऊर्फ बंडू जाधव, इंद्रजीत पवार, तानाजी चव्हाण, अशोक निकम यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.