प्रा. धनाजी चव्हाण राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचे मराठी विषयाचे अध्यापक, सांगोला लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष व विद्यमान झोन चेअरमन व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सांगोला प्रमुख कार्यवाह प्रा. धनाजी चव्हाण यांना निर्वाण फाउंडेशन नाशिक यांचे वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार नाशिक येथील रोटरी क्लब सभागृहामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री ‘जैतर’ चित्रपट फेम सायली पाटील यांचे शुभहस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे वरिष्ठ पोलिस अधिकारी विजय पगारे, मिसेस इंडिया शिल्पी अवस्थी, उद्योगपती मकरंद साळे व निर्वाण फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. सन्मानपत्र, शाल व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. प्रा. चव्हाण सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे मराठी विषयाचे अध्यापन करतात. त्यांनी चंद्रकुमार नलगे यांच्या ललित गद्याचा चिकित्सक अभ्यास या विषयावर एम. फील पूर्ण केले आहे आहे.

व मराठी विषयामध्ये पीएच.डी.साठी संशोधन सुरू आहे. त्यांना यापूर्वी शैक्षणिक कार्यासाठी गुणवंत शिक्षक पुरस्कार सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला जिल्ह्यास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मनोरमा परिवार सोलापूर, विद्यार्थी परायण शिक्षक पुरस्कार साने गुरुजी कथामाला जिल्हा समिती सोलापूर, लोकमंगल शिक्षकरत्न पुरस्कार, लोकमंगल फाउंडेशन सोलापूर, राज्यस्तरीय सह्याद्री शिक्षक रत्न पुरस्कार नगर व राष्ट्रस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मुंबई सामाजिक कार्यासाठी लायन्स प्रांत स्तरावरील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

या यशाबद्दल सांगोला तालुका व शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सचिव म. शं. घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत, संस्था कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके, सर्व संस्था सदस्य, प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य शहिदा सय्यद, पर्यवेक्षक व शुभेच्छा दिल्या. अजय बारबोले, पोपट केदार, बिभीषण मानेयांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.