सोलापूरमध्ये मोठा ट्विस्ट!

लोकसभा मतदारसंघात ऐनवेळी मोठा ट्विस्ट आला आहे. येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा (22 एप्रिल) शेवटचा दिवस आहे. वंचित बहुजन आघाडीचे ते अधिकृत उमेदवार आहेत. मात्र स्थानिक कार्यकारणी मदत करणार नाही हे लक्षात आल्याने त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आता सोलापुरातील निवडणुकीचे गणित बदलणार आहे. 

माझी उमेदवारी जाहीर झाल्यापासून गेल्या पंधरा दिवसांपासून मी सोलापूर जिल्ह्यात आलो. इथे आल्यानंतर माझी सोलापूरच्या कार्यकारिणीशी भेट झाली. सोलापूरच्या जनतेलाही मी भेटलो. आंबेडकरी चळवळ माझ्या डीएनएमध्ये आहे. मी गेल्या पंधरा दिवसांत खूप काही अनुभवले आहे. या पंधरा दिवसांत मी जे अनुभवले ती चळवळ नाही. सोलापुरातील भोळीभाबडी जनता आंबेडकर या एका नावासाठी भावनिक आहे.जनतेला आंबेडकरांबद्दल आदर आहे. पण पंधरा दिवसांच्या कालावधीत मला समजलं की, चळवलीसाठीची फळी पोकळ आहे. ही फळी पोषक नाही, अशा भावना राहुल गायकवाड यांनी व्यक्त केल्या.