उद्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मद्यविक्री दुकाने बंद

उद्या देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होणार आहे. सोलापूर जिल्हयात साजऱ्या होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त सोलापूर जिल्हयात सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी सोलापूर महानगरपालिका हद्द वगळून सोलापूर ग्रामीण जिल्हयातील सर्व देशी विदेशी मद्य विक्री दुकाने तसेच ताडी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद निर्गमित केले आहेत.

तसेच दिनांक २१ एप्रिल २०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगता मिरवणुकी निमित्त सोलापूर महानगरपालिका हद्दीतील सर्व देशी विदेशी मद्य विक्री दुकाने व ताडी दुकाने मदयविक्रीसाठी बंद राहतील. महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम मधील कलम १४२ (१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यां विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.