ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची सोलापूरच्या पालकमंत्री पदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे सोलापुरात भाजप पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त करून जिल्ह्याच्या विकासाची अपेक्षा व्यक्त केली आहे. भाजपची सत्ता आल्यानंतर मंत्रिपदाचे वाटप होऊनही अनेक दिवसांपासून पालकमंत्रिपदाचा तिढा कायम होता. मात्र शनिवारी राज्यपालांच्या आदेशानुसार शासनाचे उपसचिव दिलीप देशपांडे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. त्यामध्ये सोलापूरचे पालकमंत्री म्हणून गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार असल्याने भाजपचा पालकमंत्री करण्यात आला आहे. मात्र स्थानिक आमदारांपैकी एकालाही मंत्रिपदाची संधी न दिल्याने कार्यकर्त्यांसह आमदारांमध्येही नाराजग पसरल्याची चर्चा भाजप कार्यकर्त्यांमध्ये होत आहे.
सोलापूरच्या पालकमंत्रिपदी जयकुमार गोरे यांची नियुक्ती
