हातकणंगले मतदारसंघात शिंदे सेनेचे खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डी. सी. पाटील, शेतकरी नेते रघुनाथ पाटील, शिवाजी माने अशी बहुरंगी लढत होत आहे. येथेही प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. सभा, मेळाव्यातून उमेदवाराच्या विजयाची खात्री व्यक्त केली जात आहे.
एकूण चुरस पाहता मताधिक्याचा आकडा किती मोठा असणार याबाबत सध्या तरी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी उमेदवारांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसत आहे. कार्यकर्त्यांच्या पातळीवर लाखाच्या मताधिक्याने विजयी होऊ असे सांगितले जात असले तरी वरिष्ठ नेते मात्र तूर्त तरी बचावात्मक पवित्र्यात आहेत. मतदारसंघातील मताधिक्याबाबतच्या भिन्न भूमिका चर्चेचे निमित्त ठरले आहे.