खा. रणजितसिंह निंबाळकरांच्या जनता दरबारातून समस्यांचा जागेवरच निपटारा

माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या जनता दरबारात सांगोला शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी आपली गाहाणी आणि प्रश्न मांडण्यासाठी मोठी गर्दी केली होती. नागरिकांचे प्रश्न समस्या ऐकून येत खासदार रणजीतसिंह निंबाळकरांनी समस्यांचा जागेवरच निपटारा केला. निवेदन घेऊन येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे म्हणणे ऐकून घेऊन व त्यावर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन देऊन खासदारांनी नागरिकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. शेकडो नागरिकांनी लेखी निवेदन सादर करून जनता दरबारात आपल्या समस्या मांडल्या.

नागरिकांच्या तक्रारी प्रभाग स्तरावर मार्गी लावण्यासाठी तसेच प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी सांगोल्यातील जोतिलिंग कॉम्प्लेक्समध्ये जनता दरबाराचे आयोजन केले होते. खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी सकाळी अकरा वाजता सुरू केलेला जनता दरबार हा शेवटच्या नागरिकाचे म्हणणे ऐकण्यापर्यंत सुरू होता. जवळपास तीन तास चाललेल्या या जनता दरबारात तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक आपापल्या समस्या घेवून आले होते.

खा. निंबाळकर यांच्याकडे सांगोला तालुक्याच्या कानाकोपन्यातून आलेला नागरिक खासदार निंबाळकर यांची भेट झाल्यानतंर चेहऱ्यावर समाधान घेवूनचं यावेळी बाहेर पडल्याचे चित्र होते. यामध्ये प्रामुख्याने वैयक्तिक समस्या बरोबरच ग्रामीण भागातील शिष्टमंडळ, विविध सामाजिक संघटना, विविध गावचे सरपंच देखील गावाच्या समस्या घेवून जनता दरबारात उपस्थित होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते, अनेक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या जनता दरबारात या सर्वांच्या समस्या जाणून घेवून त्या द सोडविण्याच्या दृष्टीने सबंधित अधिकारी, यंत्रणा एवढेच नाही तर मंत्र्याशी बोलून समस्यांचे निराकरण त्यांनी केले. जनता दरबारात विविध विभागाच्या तक्रारी नागरिकांनी उपस्थित केल्या. यावर खा. निंबाळकर यांनी ऑन दी स्पॉट समस्या सोडवल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. जनता दरबारात अनेक नागरिक आपल्या समस्या घेऊन आले होते.

खासदारांकडून त्यांना खूप सान्या अपेक्षा होत्या. नागरिकांच्या सुविधेसाठी तुम्हाला नेमण्यात आलंय. त्यामुळे त्यांची काम करा. अन्यथा तुम्हाला विचारतो कोण, अशाप्रकारे संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी खडसावले. त्यामुळे बन्याच नागरिकांची कामे होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी किबहुना त्यांना होणाऱ्या त्रासाची जाण ठेवून नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तत्काळ सुटावे यासाठी खासदार निबाळकर यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. अनेकांना न्याय मिळाल्याने त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसू लागले.