फॅबटेक पॉलिटेक्निक च्या विद्यार्थ्यांची राधानगरी धरणास क्षेत्रभेट

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज ने सिव्हिल विभागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रभेट राधानगरी धरण व जलविद्युत प्रकल्प राधानगरी येथे आयोजित केली होती. अशी माहिती पॉलिटेक्निक चे प्राचार्य डॉ. शरद पवार यांनी दिली.

भोगावती जलसिंचन प्रकल्प राधानगरी चे अधिकारी समिर निरुखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना या धरणामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, करवीर, हातकणंगले, शिरोळ व पन्हाळा हे तालुके सिंचन क्षेत्रांमध्ये येत असून या धरणाची पाणीसाठा क्षमता २३६.७९ दशलक्ष घनमीटर असल्याचे सांगितले. तसेच १.२ मेगा वॅट च्या ४ जनित्राद्वारे वीजनिर्मिती कशी होते याची माहिती समजावून सांगितली.

अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सोडण्यासाठी असणारे स्वयंचलित दरवाजे, सिंचनाखाली येणारे क्षेत्र व वीजनिर्मिती कशी होते याची अभ्यासपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी या क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आल्याचे सिव्हिल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. शाम कोळेकर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी असे विधायक उपक्रम राबविण्यासाठी फॅबटेक टेक्निकल कॅम्पस सदैव कटिबद्ध असल्याचे संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर यांनी सांगितले.

या क्षेत्रभेटी बद्दल संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे, डायरेक्टर डॉ.डि.एस. वाडकर यांनी विद्यार्थ्याचे व प्राध्यापकांचे अभिनंदन केले. या क्षेत्रभेटीसाठी प्रा. अक्षता जगताप, प्रा. अश्विनी पोळ, प्रा. प्रफुल्ल कांबळे व प्रा. संतोष चोथे यांनी परिश्रम घेतले.