सांगोला तालुक्यात कडकडीत बंद स्व. गणपतराव देशमुख यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा केला निषेध

स्व. आमदार गणपतराव देशमुख यांच्या घरावर भाजप प्रवेशाच्या रॅली दरम्यान अज्ञात आक्तीकडून झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सांगोला शहरात दुपारी २ वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला. दारूची बाटली फेकण्याचे कृत्य करणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा निषेध करीत प्रारंभी महात्मा फुले चौक ते तहसील कार्यालय या दरम्यान रीली काढून निषेध करण्यात आला. रेली दरम्यान अमर रहे अमर रहे स्व. भाई गणपतराव देशमुख अमर रहे’, हल्ला करणाऱ्या आरोपींचा निषेध असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

आ.डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले, दीपावली सणाच्या तोंडावर बंदची हाक देणे उचित नवहते, परंतु लोकांच्या भावना तीव्र असल्यामुळे लोकांकडूना बंद पुकारण्यात आला आहे. स्व. माजी आमदार सतराव देशमुख यांनी सांगोला तालुक्याला एका उंचीवर नेले. त्यांचे विचार आपण सर्वांनी जपायला हवेत. कुणाच्या केसाला धक्का लागणार नाही याची जबाबदारी माझी असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.

डॉ. अनिकेत देशमुख महणाले, स्व. गणपतराव देशमुख यांची वास्तू ही तालुक्याच्या विकासाची साक्षीदार आहे. ६० वर्षात कधीही कोणीही एक खडा फेकण्याची हिंमत केली नाही. ज्यांनी कोणी ही घटाना केली त्यांनी आता विचार करण्याची वेळ आली आहे की आपण कोणत्या लोकांना ताकद देतोय. कोणत्या प्रवृत्ती यात्ता खतपाणी देत आहेत, याचा विचार करावा लागेल.

यावेळी ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड, अतुल पवार, तुषार इंगळे, नंदकुमार शिंदे, अरविंद केदार, बापू ठोकळे, नंदू शिंदे, कल्पनाताई शिंगाडे, किरण सरवर वांनी आपले मनोगत व्यक्त केले. मोचप्रिसंगी चंदन होनराव, शिवाजी नाना बनकर, दत्ता सावंत, राजकुमार पवार यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये माणून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी कडेकोट चंदोबस्त तैनात केला होता.