सांगोल्यात 18 जुलैला होणार लोककलावंतांचे आंदोलन…

अनेक वर्षांपासून लोककलावंतांच्या न्याय मागण्यांसाठी मोर्चे उपोषण, आंदोलन, मेळावा अशा वेगवेगळ्या माध्यमातून शासन दरबारी न्याय मागण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. विविध क्षेत्रातील विविध लोककलावंतांना सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई, सांस्कृतिक कार्यमंत्री, पालकमंत्री महोदय यांना रितसर निवेदन विविध मागण्यांसाठी दिलेले होते.

यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम मिळणेबाबत, सांस्कृतिक विभागाच्या विविध योजनांचा लाभ हा वृद्ध कलावंत मानधन, मयत कलावंतांच्या वारसाला वारस प्रमाणपत्र मिळणेबाबत तसेच मानधन निवड समिती स्थापन करण्याबाबत तीन वर्षापासून चे प्रलंबित वृद्ध कलावंतांचे प्रस्ताव हे अर्ज निकाली काढण्याबाबत यासारख्या अनेक शिफारसी या निवेदनाद्वारे करण्यात आल्या होत्या.

आता आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या हक्काच्या न्याय मागणीसाठी कलावंतांच्या व्यथा कथा शासन दरबारी पोहोचविण्यासाठीच लोककलावंतांचे विविध मागणी संदर्भात 18 जुलै रोजी सांगोला तहसील कार्यालय समोर आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता महात्मा फुले चौकातून महापुरुषांच्या स्मारकांना पुष्पहार अर्पण करून शोभा यात्रेला सुरुवात होणार असल्याची माहिती शाहीर सुभाष गोरे व सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे यांनी दिलेली आहे.