नंदूर (ता. मंगळवेढा) येथील ग्रामदैवत बिरोबा यात्रेनिमित्त शनिवार, २७ एप्रिल रोजी जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.पैलवान रामा शेळके विरुद्ध तेजस काळे यांच्यात ५१००० हजार रुपयांची प्रथम क्रमांकाची कुस्ती, बाळकृष्ण शेळके विरुद्ध अजय नागणे यांच्यात ३१००० रुपयांची द्वितीय क्रमांकाची कुस्ती, सौरभ घोडके विरुद्ध जोतिबा लोखंडे यांच्यात २५००० हजार रुपयांची तृतीय क्रमांकाची, प्रवीण पवार विरुद्ध श्रीनिवास भोसले यांच्यात २१००० हजार रुपयांची चतुर्थ क्रमांकाची कुस्ती खेळविण्यात येणार आहे.
याशिवाय इतर नामवंत मल्लांच्या कुस्त्याही खेळविण्यात येणार आहेत. सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत कुस्त्या नेमले जातील. पैलवान दामोधर घुले हे कुस्ती निवेदक, तर परसुराम चौगुले, परमेश्वर येणपे, महालिंग मनगेनी, हरी हेगडे, दामोदर कांबळे, लक्ष्मण पवार हे पंच म्हणून काम पाहणार आहेत. दि. २६ रोजी सकाळी नऊ वाजता बिरलिंगेश्वर गायन संघ मुगळ्याळ, सुमित्रा व आमोगसिद्ध गायन संघ झाकीर कारकल यांच्यात ढोलकीची गाणी होणार आहेत. दि. २७ रोजी सायंकाळी साडेसात वाजता सप्तसुर कोल्हापूर यांचा ऑर्केस्ट्रा होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.