उदनवाडी येथे श्रीनंद हॉस्पिटलच्या वतीने लहान बालकांची आरोग्य तपासणी

येथील डॉ. राजेंद्र जानकर यांच्या श्रीनंद हॉस्पिटलच्या वतीने मंगळवार ७ नोव्हेंबर रोजी उदनवाडी ता. सांगोला येथे बालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यामध्ये मोफत लहान मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या आरोग्य शिबीरासाठी उदनवाडी व आसपासच्या परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सांगोला शहरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. राजेंद्र जानकर यांच्या श्रीनंद हॉस्पिटल येथे पिवळे व केशरी रेशनकार्ड धारकांना महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या योजने अंतर्गत मोफत उपचार केले जातात.

तरी सांगोला तालुक्यातील गरनु रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. श्रीनंद हॉस्पिटलमध्ये कमी वजनाचे बाळ, कमी, कमी दिवसाचे बाळ यांच्यावर उपचार केले जातात. या शिबिरासाठी दिंगबर शिंगाडे, प्रशांत बलेकर, आबासो आलदर अशोक वलेकर, समीर मुलाणी, बाबुराव मार्कड, तात्यासो कोरपे, राजू स्वामी, श्रीकांत टिंगरे, उत्तम टिंगरे, रामहरी मिसाळ, आरोग्य सेविका आरती कदम, अंगणवाडी सेविका पुजारी व तांबोळी, व श्रीनंद हॉस्पिटलचे डॉ. नरेंद्र कुंडले, अमर खरात, विजय मोरे, दिपक झुरळे व ग्रामस्थ उपस्थित होते.