सांगोला, दररोज सकाळी लिलावाच्या वेळी विविध प्रकारच्या फळ व पालेभाज्यांनी गच्च भरलेल्या मार्केट मध्ये मागील आठवड्यापासून मालाची आवक कमी झाली आहे. परिणामी सर्वच भाज्यांचे दर वाढले असून ग्राहकांच्या मागणी प्रमाणात भाज्यांची उपलब्धता नसल्याचे दिसून येत आहे.
शेतकऱ्यांसाठी ताजा पैसा मिळवून देणाऱ्या पिकामध्ये भाजीपाला उत्पादनाला महत्व आले असून सांगोला तालुक्यातील मोठा शेतकरी वर्ग सध्या विविध प्रकारच्या फळ व पालेभाज्या उत्पादन करीत आहे. यासाठी सांगोला भाजीपाला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याच्या अडती घेऊन येत असतात ,. मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने भाजीपाला उत्पादनाचे वेळापत्रक बिघडवून टाकले आहे. सततच्या पावसाने भाजी उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून , ग्राहकांच्या मागणीप्रमाणे भाजीपाला पुरवठा होत नाही. परिणामी सर्व प्रकारचा भाजीपाला व फळे यांच्या किमती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.
भाजीपाल्याचे सर्वसाधारण दर
देशी वांगी, मेथी, शेपू, चुका, चाकवत अश्या हिरव्या पालेभाज्या २० रुपयास एक जुडी तर देशी शेवगा २० रुपये (४नग) एक पेंडीशिवाय पतीचा ओला कांदा,मिरची,घेवडा,सिमला मिरची,फ्लॉवर,पत्ता कोबी यादेखील भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत.
