चंद्रहार पाटलांसह समर्थकांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

 महाविकास आघाडीचे सांगली लोकसभेचे (Sangli Loksabha) उमेदवार चंद्रहार पाटलांसह  यांच्यासह समर्थकांवर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. विनापरवाना प्रचार पदयात्रा काढल्यामुळं हा गुन्हा दाखल झालाय. चंद्रहार पाटील यांनी मिरज तालुक्यात विनापरवाना प्रचार फेरी काढली होती.  

त्यानंतर पाटील यांच्यासह 2 ते 3 समर्थक  कार्यकर्त्यांवर गुन्हा आचारसंहिता भंगाचा दाखल करण्यात आलाय.24 एप्रिल रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2.30  या वेळेत खटाव, बेडग गावात  मतदारांच्या गाठीभेटी घेऊन  लोकसभा  निवडणुकीसाठी चंद्रहार पाटील यांनी प्रचार पदयात्रा काढली होती. मात्र, ही प्रचार पदयात्रा काढण्यापूर्वी त्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळं पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी आचारसंहितेच्या नियमांचा भंग केला आहे.

त्यामुळं त्यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच निवडणूक आयोगाकडून नियमावाली प्रसिद्ध करण्यात येते. यामध्ये आचारसंहितेसंदर्भात काही नियम असतात. त्या नियमांचे निवडणुकीच्या काळात पालन करणं प्रत्येक उमेदवाराला बंधनकारक असते. मात्र, नियमांचा भंग केल्यास कारवाई होते.