चांदोली व कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे व सध्या पडत असलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नदी पात्रात वाढ झाल्याने पुराचे पाणी पाहण्यासाठी नागरीक गर्दी करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
आयर्विन पुलावरुन तसेच नदी काठावरील असणाऱ्या गावांमध्ये काही तरुण मुले व नागरीक पुराच्या पाण्यात पुलावरून उड्या मारणे, स्टंटबाजी करून सेल्फी घेत असल्याचे प्रकार घडत आहेत.
या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 27 ठिकाणी व त्यापासुन 100 मिटर परिसरात पूर परिस्थिती सामान्य होईपर्यंत प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी भारतीय नागरीक संरक्षण संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार 26 जुलै ते 6 ऑगस्ट या कालावधीसाठी पुढीलप्रमाणे मनाई आदेश जारी केला आहे.