लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात आज देशातील 88 मतदारसंघात मतदान

आज देशभरात दुसऱ्या टप्प्याच मतदान होणार आहे. देशात 88 तर राज्यात 8 मतदारसंघात मतदान होणार आहे. एकूण 12 राज्यात आज मतदार आपला मतदानाचा (Lok Sabha Election)   हक्क बजावतील. राज्यात  आज विदर्भातले बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ तर मराठवाड्यातले हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात मतदान होईल.

अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या केरळातल्या वायनाड मतदारसंघात आज मतदान होणार आहे.दुसऱ्या टप्प्यात केरळमधील सर्व 20, कर्नाटकातील 14, राजस्थानमधील 13, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी 8, मध्य प्रदेशातील 6, आसाम आणि बिहारमधील प्रत्येकी 5, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 3 आणि जम्मू-काश्मीर आणि त्रिपुरामधील 1 जागेचा समावेश आहे. याशिवाय मणिपूरचा 1 भाग म्हणजे मणिपूर बाह्य सीट.  

लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र सकाळी 6 वाजता मॉक पोलला सुरुवात झाली. ईव्हीएम व्यवस्थित काम करतंय की नाही हे यातून तपासलं जातं.  दरम्यान मतदान केंद्र अधिकारी आणि सर्वच यंत्रणा सज्ज आहे.