सन २०११ पासून प्रलंबित असलेल्या सांगोला शहर भुयारी गटारी योजनेच्या कामाला मंजूर मिळण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी आमदार झाल्यापासून सातत्याने पाठपुरावा केला होता सुरुवातीला ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या या योजनेचा खर्च आता १२५ कोटी रुपयांपर्यंत गेला असून त्यामधील टप्पा क्रमांक १ च्या ९६ कोटी ६३ लाख रुपयांच्या कामाला ऑक्टोंबर २०२३ ला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत या योजनेला मंजुरी मिळाली असून पहिल्या टप्प्याच्या कामासाठी एकूण ९६ कोटी ६३ लाख यामध्ये ८६ कोटी ९६ लाख रुपये महाराष्ट्र शासनाकडून अनुदान मिळणार असून उर्वरित ९ कोटी ६६ लाख रुपये सांगोला नगरपरिषदेला द्यावे लागणार आहेत. सांगोला शहर भुयारी गटार योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी ९६ कोटी ६३ लाख रुपये मंजूर झाले असून त्याचे प्रत्यक्ष कामास बायपास रोड वरील वंदे मातरम् चौक ते माळवाडी रेल्वे पुल येथे सुरूवात झाली आहे.
हे काम दोन वर्षात पूर्ण केले जाणार असल्याचे मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यामध्ये सांडपाणी प्रक्रिया क्षमता, विविध ठिकाणी सांडपाणी गोळा करण्याची व्यवस्था करणे जलशुद्धीकरण केंद्राजवळ सांडपाण्यावर प्रक्रिया करणे यामध्ये ट्रंकमेन, पंपिंग स्टेशन, जलशुद्धी केंद्र व नालाबंध ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.
सध्या डीडब्लूसी पाइपलाईन टाकने व ठिकठिकाणी चेंबर बांधण्याच्या कामाचा मागील मार्च महिन्यात सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये मल वाहिन्यांची व्यवस्था करून पहिल्या टप्प्यांमध्ये निर्माण केलेल्या मलप्रक्रिया व्यवस्थेस जोडण्यात येणार आहे. सदरचे काम सांगोला नगरपरिषदेमार्फत करण्यात येणार आहे. बऱ्याच वर्षापासून रेंगाळलेल्या सांगोला शहर भुयारी गटार योजनेच्या कामाला प्रत्यक्ष कामस सुरूवात झाल्याने सांगोला शहरातील आरोग्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.