इचलकरंजीत रेल्वेप्रश्नाबाबत……..

इचलकरंजीत जास्तीत जास्त यंत्रमाग कारखाने आपल्याला पहावयास मिळतात. वेळोवेळी पाणी प्रश्न हा देखील इचलकरंजीचा विषय चर्चेत असतो. अशातच इचलकरंजी-हातकणंगले रेल्वे बाबतीतचा मुद्दा चर्चेत येत आहे. इचलकरंजी रेल्वेचा उमेदवारांना विसर पडल्याचे दिसून येत आहे. याबाबत उमेदवारांनी तत्काळ भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन इचलकरंजी रेल्वे कृती समितीने केले आहे.

तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी इचलकरंजी-हातकणंगले या आठ किलोमीटरच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. याचे ऑनलाईन भूमिपूजनही झाले आहे. पण, कित्येक वर्ष हा प्रश्‍न रेंगाळत पडला आहे.

वेळोवेळी लोकप्रतिनिधी, रेल्वे मंत्रालय, मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करूनही दखल घेतली गेली नाही. उमेदवारांनी भूमिका स्पष्ट केली नाही तर आपली भूमिका लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे कृती समितीकडून सांगण्यात आले.