इचलकरंजीत मतदान जनजागृतीसाठी सायकल रॅली….

सद्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गावोगावी भेटीगाठी सभा दौरे सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी मतदान जनजागृतीसाठी शासनाकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.येथे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले यांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामध्ये स्वीपअंतर्गत मतदान जनजागृतीसाठी आज सायकल रॅली काढली.

शिवतीर्थ येथून सकाळी सहा वाजता सायकल रॅलीचा प्रारंभ केला.

लोकशाही बळकटीकरणासाठी सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन रॅलीच्या माध्यमातून केले. रॅलीची सुरुवात शिवतीर्थपासून तारदाळ-खोतवाडी-कोरोची-कबनूर-चंदूर ते परत शिवतीर्थ असा ५० किलोमीटर प्रवास केला.

सायकल रॅलीमध्ये शहरातील आय. एम. फिट क्लब, रिंगण फिटनेस, टीम अर्जुना, टीम भारत, टीम उदय सर, एक. के. फिटनेस, आर. बी. सी. ग्रुप, मॉर्निंग ग्रुप, सह्याद्री सायकल क्लब, सायकल क्रेझी, स्वस्थ रहे, मस्त रहे, नीलेश फिटनेस क्लब, डॉक्टर ग्रुप, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी युनिकोड, राजाराम वॉकर आदी सहभागी झाले होते.