आज संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस म्हणूनही साजरा केला जातो. 1960 साली महाराष्ट्र स्वतंत्र राज्य म्हणून स्थापन झाल्याचा हा दिवस आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीचे वैभव लक्षात ठेवण्याची आणि राज्याचा समृद्ध वारसा समजून घेण्याची संधी हा दिवस देतो.
हा दिवस महाराष्ट्राच्या स्थापना दिनानिमित्त साजरा केला जातो. विशेष म्हणजे आज गुजरात दिवसही आहे.स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्याच्यानंतर काही काळ गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन्ही राज्य मुंबई प्रांताचे भाग होते. त्यावेळी या मुंबई प्रांतात मराठी आणि गुजराती भाषकांची संख्या अधिक होती. दोन्ही भाषिकांकडून स्वतंत्र राज्याची मागणी केली जात होती. त्यामुळे भाषावार प्रांतरचनेमुळे गुजरात आणि महाराष्ट्र या दोन वेगळ्या राज्याची घोषणा करण्यात आली.
1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. त्यामुळे 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. तसेच 1 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो.
- आम्हाला अभिमान आहे, महाराष्ट्रीय असल्याचा, आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा, आम्ही जपतो आमची संस्कृती, आमची निष्ठा, महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा.. जय महाराष्ट्र..!
- महान संतांची जन्मभूमी, विज्ञानाने जेथे केली प्रगती प्रेम, आदर, स्नेह आणि माणुसकी हीच आहे आमची संस्कृती. महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा.. जय महाराष्ट्र..!
- जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी… गुणगुणलो जे गीत गीत मराठी… मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा