मुंबईला पावसाने जोरदार तडाखा दिला. त्यातच महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि घरगुती पीएनजीच्या किंमतीत वाढ केली असून नवे दर आज, मंगळवारपासून अमलात येतील. सीएनजी 1,50 रुपयांनी, तर पीएनजी 1 रुपयाने महाग झाले आहे. सीएनजी, पीएनजीच्या दरवाढीने ग्राहकांना वाहन चालवण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी अधिक खर्च येणार आहे. एकाचवेळी दोन्ही इंधन महागल्याने मुंबईकरांच्या खिशावर आता भार येणार आहे.
नव्या दरानुसार, मुंबईकरांना एक किलो सीएनजीसाठी ७५ रुपये तर घरगुती पीएनजीसाठी ४८ रुपये मोजावे लागतील. पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजीचे दर कमी असले तरी मुंबईतील बऱ्याच टॅक्सी व रिक्षा सीएनजीवर चालत असल्यामुळे प्रवास महागण्याची शक्यता आहे. तसेच, पीएनजी दरवाढीमुळे गृहिणींचे महिन्याचे अंदाजपत्रकही कोलमडू शकते. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि घरगुती पीएनजीच्या किंमतीत वाढ केली असून नवे दर आज, मंगळवारपासून अमलात येतील. सीएनजी दीड रुपयांनी, तर पीएनजी एक रुपयाने महाग झाले आहे.
मुंबईकरांना नव्या दरानुसार एक किलो सीएनजीसाठी ७५ रुपये तर घरगुती पीएनजीसाठी ४८ रुपये मोजावे लागतील. पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजीचे दर कमी असले तरी मुंबईतील बऱ्याच टॅक्सी व रिक्षा सीएनजीवर चालत असल्यामुळे प्रवास महागण्याची शक्यता आहे.रिक्षा टॅक्सी चालकांकडून प्रवासी भाडे देखील वाढले पाहिजे अशी मागणी आता करण्यात येत आहे.
महानगर गॅसने याविषयीची माहिती दिली आहे. त्यांनी दरवाढीचे कारण दिले आहे. त्यानुसार, सीएनजी आणि घरगुती पाईप नैसर्गिक गॅस, पीएनजीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, मागणी आणि पुरवठ्याचे व्यस्त प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी महानगर गॅसला कसरत करावी लागत आहे. बाजार मूल्याआधारीत खरेदी होत असल्याने त्यांना दरवाढ करावी लागली आहे.
सीएनजी आणि पीएनजी किंमतीत वाढ झाली असली तरी दोन्ही इंधन पेट्रोल आणि डिझेलपेक्षा स्वस्त आहे. महानगर गॅसची सीएनजीची किंमत मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत अनुक्रमे जवळपास 50 टक्क्यांनी आणि 17 टक्क्यांनी स्वस्त आहे.