LPG Price 1 May : सर्वसामान्यांना दिलासा LPG च्या किमतीत घट…….

सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत घट झाली आहे. तेल विपणन कंपन्यांनी 1 मे पासून तत्काळ प्रभावीपणे व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती 19 रूपयांनी कमी केल्या आहेत.यासह, 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत ₹ 1,745.50 इतकी झाली आहे.सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आजपासून देशातील विविध शहरांमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 19 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. मात्र, या कपातीचा लाभ केवळ 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरवरच मिळणार आहे. यावेळीही घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

मागील महिन्यातही एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली होती. गेल्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून म्हणजेच १ एप्रिलपासून १९ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत ३५ रुपयांनी कमी करण्यात आली होती. त्याआधी सलग तीन महिने व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत वाढ होताना दिसत होती.घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती मार्च महिन्यात कमी झाली होती.

त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला दिनानिमित्त (8 मार्च 2024) एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली होती. त्याच्या एक दिवस आधी म्हणजे ७ मार्चला मोदी सरकारने एलपीजी सिलिंडरच्या बाबतीत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. त्यानंतर मंत्रिमंडळाने 31 मार्च 2025 पर्यंत पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 300 रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली होती.

तेल विपणन कंपनी इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, 1 मे पासून राजधानी दिल्लीत 9 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 19 रुपयांनी (दिल्ली एलपीजी किंमत) कमी झाली आहे आणि त्याची किंमत 1764.50 रुपयांवरून 1745.50 रुपयांवर आली आहे. त्याचप्रमाणे, मुंबईतील व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 1717.50 रुपयांवरून 1698.50 रुपयांवर आली आहे. चेन्नईमध्येही हा सिलेंडर १९ रुपयांनी स्वस्त झाला असून त्याची किंमत १९३० रुपयांवरून १९११ रुपयांवर आली आहे.