बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आपल्या चित्रपटांसोबतच पर्सनल लाइफमुळे चर्चेत असते. नुकताच दीपिका पदुकोणने बाफ्टा अवॉर्डला हजेरी लावली.
शनिवारी म्हणजेच १८ फेब्रुवारीला लंडनमधील रॉयल फेस्टिव्हल हॉलमध्ये आयोजित ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स म्हणजेच BAFTA 2024 पुरस्कारांमध्ये दीपिका पदुकोणने भारताचे प्रतिनिधित्व केले.
यावेळी दीपिका पदुकोणच्या लूकने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं. देसी लूकमध्ये दीपिकाने या अवॉर्ड शोला हजेरी लावली. दीपिकाच्या या लूकची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.
ग्लोबल स्टार्ससोबत दीपिका पदुकोण प्रेझेंटर म्हणून कार्यक्रमात सहभागी झाली होती. तिने दिग्दर्शक जोनाथन ग्लेझर यांना त्यांच्या ‘द झोन ऑफ इंटरेस्ट’ या चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट नॉट इन द इंग्लिश लँग्वेज’ पुरस्कार दिला. या अवॉर्ड शोमध्ये दीपिका पदुकोणने भाषण देखील केले. तिच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते तिचे भरभरून कौतुक करत आहेत.
दीपिका पदुकोणची भाषण आणि पुरस्कार देण्याची शैली सर्वांना आवडत आहे.दीपिका पदुकोणने बाफ्टा अवॉर्ड शोला देसी लूकमध्ये हजेरी लावली होती. दीपिकाच्या साडी लूकची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. बाफ्टा अवॉर्ड्स 2024 मधील दीपिकाचे साडी लूकमधील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दीपिकाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या लूकमधील फोटो शेअर केले आहेत. तिचा हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. या लूकच्या माध्यमातून तिने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.