कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) नं आज इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन (ICSE) म्हणजेच, दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर केले आहेत. या वर्षी ICSE बोर्डाच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी आता CISCE बोर्डाची अधिकृत वेबसाईट cisce.org वर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशननं ICSE आणि ISC परीक्षा वर्ष 2024 चे निकाल जाहीर केले आहेत. 2,695 शाळांपैकी 82.48 टक्के (2,223) शाळांमधील विद्यार्थी 100 टक्क्यांसह उत्तीर्ण झाले आहेत. तर 1,366 शाळांपैकी ISC (इयत्ता बारावी) वर्ष 2024 परीक्षेसाठी 66.18 टक्के (904) शाळांमधील विद्यार्थी 100 टक्के गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत. ICSE परीक्षांमध्ये मुंलींनी बाजी मारली आहे. 99.65 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर 99.31 टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत. तर बारावीच्या परीक्षांमध्येही मुलींनीच बाजी मारली असून 98.92 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर, 97.53 टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत.