SSC HSC Exam : १०वी-१२वी परिक्षेचे खोटे वेळापत्रक व्हायरल! राज्य मंडळांने अधिकृतपणे केला खुलासा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाद्वारे दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्याच्या कालावधीत दहावी-बारावी बोर्डाचे (SSC HSC Exam) परीक्षा घेण्यात येतात. त्यापूर्वी विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाकडून (Education Department) परिक्षेचे वेळापत्रक देखील जारी केले जाते. मात्र सध्या सोशल मीडियावर १०वी-१२वी २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या परिक्षेचे वेळापत्रक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच परिक्षांच्या (Exam Timetable) तारखांबाबत चुकीच्या अफवाही पसरवल्या जात असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे याप्रकरणावर बोर्डाने एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

दहावी बारावीच्या परिक्षांबाबत पसरवल्या जाणाऱ्या मेसेजबाबत राज्य मंडळांने परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार, सोशल मीडियावर व्हायरल होत असणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक विषयावर विश्वास न ठेवण्याचे सांगितले आहे.

दरम्यान, फेब्रुवारी- मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या १०वी आणि १२वीच्या परिक्षांची वेळापत्रके www.mahasscboard.in या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आलेल्या वेळापत्रकावरच विश्वास ठेवावा, असेही म्हटले आहे.