‘गुलाबी साडी’ हे गाणं लिहिणारा संजू राठोड आहे तरी कोण?

गुलाबी साडी या गाण्याने भारतातच नाही तर जगभरातल्या संगीतप्रेमींना अक्षरश: वेड लावलं. अगदी सामान्यांपासून ते मोठ मोठ्या सेलिब्रेटींना देखील या गाण्याची भुरळ पडली. इतकच नव्हे तर मराठी फिल्मफेअरच्या मंचावर देखील हे गाणं सादर करण्यात आलं. पण या गाण्यासोबतच एक प्रश्न प्रेक्षकांना नक्कीच पडला. तो म्हणजे हे गाणं लिहिणारा संजू राठोड (Sanju Rathod) नेमका आहे तरी कोण? दरम्यान संजूने नुकतची ‘एबीपी माझा’ला मुलाखत दिली. त्यामध्ये त्याने त्याच्या सांगितीक प्रवासाचा उलगडा केला आहे. 

गुलाबी साडी या गाण्यामुळे संजूला जगभरात प्रसिद्धी मिळाली. याआधी हे गाणं कसं लिहिलं याबाबत देखील संजूने भाष्य केलं होतं. संजू हा मुळचा जळगावचा राहणारा आहे. जसा प्रत्येकाचा प्रवास असतो, तसाच माझाही प्रवास असल्याचं यावेळी संजूने म्हटलं. तसेच इंजिनीअरिंगचं शिक्षण घेणारा संजूला संगीताचं बाळकडू हे घरातूनच मिळालं असल्याचं त्याने यावेळी म्हटलं आहे.