मित्रांनो आपण जशी थंडीमध्ये आपल्या त्वचेची काळजी घेत असतो, तशीच उन्हाळ्यात सुद्धा त्वचेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. तसे न केल्यास आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. चला तर बघूया उन्हाळ्यात घरच्या घरी आपण त्वचेची काळजी कशी घेऊ शकतो व आपली त्वचा कशी टवटवीत व निरोगी ठेवू शकतो.
- उन्हाळ्यात त्वचा टवटवीत ठेवण्यासाठी पाणी भरपूर प्रमाणात पिणे आवश्यक आहे. तसेच आहारात पाणीदार फळांचा समावेश असावा.
- त्वचेची काळजी कशी घ्यावी यासाठी तुम्हाला तुमचा त्वचा प्रकार माहित असणे गरजेचे आहे. त्यामुळे योग्य उपाययोजना करून त्वचेची होणारी हानी टाळता येते.
- डोळ्यांखालची काळी वर्तुळे कमी करण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करावा. उन्हात सतत काम पडत असेल, तर दर २ तासांनी सनस्क्रीनचा वापर करू शकतो.
- त्वचा प्रकारानुसार योग्य ते स्क्रब वापरून त्वचेवरील डेड स्कीन काढून टाकल्यास त्वचा जास्त टवटवीत दिसू लागते. १५ दिवसांतून एकदा त्वचा एक्सफोलिएट करून घ्यावी.
- उन्हाळ्यात शक्यतो सुती, मुलायम व सैल कपड्यांचा वापर करावा.
- उन्हाळ्यात अनेकदा अंगाला घामाचा वास येत असतो. हे टाळण्यासाठी दररोज आंघोळीच्या पाण्यात २ थेंब इसेन्शिअल तेल टाकून आंघोळ करावी.
- व्हिटॅमिन सी युक्त क्रीम, पावडर यांचा वापर करावा.
- दररोज एक वेळा सी. टी. एम. करावे. सी. टी. एम. म्हणजे क्लिनसिंग, टोनिंग व मॉइश्चरायझिंग. क्लिनसिंग – चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुवावा. टोनिंग – चेहरा गुलाबजलने स्वच्छ धुवावा. मॉइश्चरायझिंग – मॉइश्चरायझर लावावे.
- नैसर्गिक उत्पादनांचा वापर करावा. फळांचा लेप चेहर्यावर २० मिनिटे लावून ठेवावा व नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा. केमिकलयुक्त उत्पादनांमुळे इतर त्वचा विकारांचा धोका उद्भवू शकतो.
- कोमट पाण्याने आंघोळ करावी. खूप गरम पाणी वापरल्यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते.
- डोळ्यांची होणारी जळजळ टाळण्यासाठी डोळ्यांवर थंड पाण्याची पट्टी किंवा काकडीचे तुकडे यांचा वापर करावा.
- बर्फाचे तुकडे एका कापडात ठेऊन त्वचेवर ठेवल्यास त्वचा शांत व थंड होण्यासाठी मदत होते.
- घामोळ्या व पुरळ यापासून बचाव करण्यासाठी आहारात दही, ताक अशा पदार्थांचा जास्तीत जास्त वापर करावा.
- चेहरा दिवसातून २ वेळा स्वच्छ पाण्याने किंवा फेसवॉशने धुऊन काढावा.
- शक्यतो वॉटर बेस्ड मेकअपचा वापर करावा किंवा कमीत कमी मेकअप असावा. उन्हाळ्यात मेकअप शक्यतो टाळावा.
- आहार व व्यायामासोबत पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आद्रता संतुलित राहते व चेहरा सतेज दिसतो.
तर मित्रांनो, वरील पद्धतीने आपण आपल्या त्वचेची योग्यरीत्या काळजी घेऊया आणि उन्हाळ्याला सुसह्यपणे सामोरे जाऊया.