अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोन्याचे दर कोसळले

अक्षय्यतृत्तीयेच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करणे शुभ मानलं जाते. तुम्हीदेखील या दिवशी सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आज थोडा दिलासा मिळू शकतो. उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याच्या दरात गुरुवारी थोडी घसरण झाल्याचे दिसून आले आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 71,093 प्रती ग्रॅम इतका झाला आहे. आज गुरुवारी  34 रुपयांनी सोन्याच्या दरात घट झाली आहे. तर चांदीचे दर 83,188 प्रति किलो आहेत.  सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण आणि चांदीचे भाव स्थिर असल्याचे बघायला मिळत आहे.

चांदीच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाहीये. 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या दरात घट झाल्याचे पाहायला मिळतंय. अक्षय्यतृत्तीयेच्या आदल्या दिवशीच सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळतंय. त्यामुळं ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात करण्यात आल्याने बुलियन मार्केटमध्ये थोडी नरमाई पाहायला मिळत आहे. अंतराराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड 0.2 टक्के घसरुन 2,308.29 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे. युएस गोल्ड फ्युचर 0.3 टक्क्यांनी घट झाली असून 2,316.30 वर पोहोचला आहे.

व्याज दरात कपात करण्यात आल्याने डॉलरमध्ये 0.1 टक्के वाढ झाली आहे. गुरुवारी सोन्याच्या दरात 110 रुपयांनी घट झाली असून आज 10 ग्रॅम सोन्याचे दर 72,160 रुपये इतके झाले आहेत. 24 कॅरेट 1 ग्रॅम सोन्यासाठी 7,216 रुपये मोजावे लागणार आहेत. तर, 22 कॅरेट 1 ग्रॅम सोन्यासाठी 6,615 रुपये मोजावे लागणार आहेत. 18 कॅरेट 1 ग्रॅम सोन्यासाठी 5,412 रुपये मोजावे लागणार आहे.