मोदींच्या प्रचार सभेसाठी शिवाजी पार्कचं मैदान मनसेनं मारलं…

अखेर 17 मे रोजी  मुंबईत पार पडणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी मनसेला  शिवाजी पार्क येथील मैदान उपलब्ध करून देण्यात आलं आहे. या मैदानावरून मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं होतं. अखेर सभेसाठी मनसेला मैदान उपलब्ध करून देण्यात आलं आहे. यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

18 मार्चला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं शिवाजी पार्क मैदान निवडणुकीच्या सांगता सभेसाठी उपलब्ध व्हावं यासाठी अर्ज करण्यात आला होता. या अर्जाचा विचार करून मुंबई महानगरपालिकेला फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर मनसेला मैदान उपलब्ध करून दिल्याची माहिती समोर आली आहे, अशी माहिती मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी दिली आहे. 

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं मनसेनं सत्तेचा गैरवापर करा हे मैदान पदरात पाडून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. ठाकरे गटाचा हा देखील दावा आहे की, पहिला अर्ज हा आमच्या वतीनं दाखल करण्यात आला होता. मात्र, मुंबई महानगरपालिका असो की, नगर विकास खाते असो दोन्ही सत्ताधारी पक्षाकडेच असल्यामुळे त्यांनी आमच्या अर्जाला केराची टोपली दाखवत मनसेला मैदान उपलब्ध करून दिलं आहे, अशी माहिती अनिल देसाईंनी दिली आहे.