कोलकत्तामध्ये महिला डॉक्टरची अत्याचारानंतर हत्या करण्यात आल्याने देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने आज देशभरातील सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये 24 तासांच्या संपाची घोषणा केली आहे.
या काळात रुग्णांची ओपीडी आणि ऑपरेशन्स होणार नाहीत मात्र आपत्कालीन सेवा सुरू राहतील.देशभरातील सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये 24 तासांच्या संपाची घोषणा केली आहे. या काळात रुग्णांची ओपीडी आणि ऑपरेशन्स होणार नाहीत मात्र, आपत्कालीन सेवा सुरू राहतील.
आज सकाळी ६ ते रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत देशभरातील डॉक्टर्स २४ तास संपावर जाणार असल्याची घोषणा इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे.