वाळवा तालुक्यातील रेठरेहरणाक्ष फाट्याजवळ वाहनाच्या धडकेमध्ये दोघे भाऊ गंभीर जखमी

नितीन धर्मा चव्हाण आणि गणेश अशोक चव्हाण दोघे राहणार कराड अशी अपघातात जखमी चुलत भावांची नावे आहेत. याबाबत मधुकर धर्मा चव्हाण यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार चारचाकी वाहन (क्र. एमएच १० ईए १४३३) वरील चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नितीन आणि गणेश चव्हाण हे दोघे त्यांच्या दुचाकीवरून (क्र. एमएच १० बीयू ०१४९) पलूसकडून कराडकडे निघाले होते. 

कराड तासगाव रस्त्यावरील रेठरेहरणाक्ष फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला समोरून आलेल्या चारचाकी वाहनाची जोरदार धडक बसली. यामध्ये दोघे भाऊ रस्त्यावर पडून डोक्याला आणि हाता-पायाला इजा होऊन गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात ४ एप्रिल रोजी दुपारी सव्वाचारच्या सुमारास झाला. अपघातानंतर चारचाकी चालकाने तेथून पलायन केले. अधिक तपास पोलीस करीत आहेत.